Trending News Viral Video: सोशल मीडिया हे इंटरनेटवरील असे व्यासपीठ आहे, जिथे दररोज काही ना काही नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात, तर काही पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारे ठरतात. असाच एक धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अत्यंत धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या संपूर्ण शरीराभोवती गवताचा पेंढा गुंडाळलेला असून, पायांपासून डोक्यापर्यंत स्वतःला झाकून घेतले आहे. त्यानंतर तो पेंढ्याला आग लावतो आणि पेटलेल्या अवस्थेत थेट बाईकवर बसतो. विशेष म्हणजे, शरीराला आग लागलेली असतानाही तो वेगात बाईक चालवत स्टंट करताना दिसतो.
हा काही सेकंदांचा व्हिडिओ पाहून अनेक जण स्तब्ध झाले आहेत. याआधी अनेक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झाले असले, तरी असा जीवघेणा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. हा स्टंट पाहता संबंधित व्यक्ती केवळ सोशल मीडियावर व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट होते.
रील ऐसी बनाओ कि
👇🏻👇🏻😂😂 pic.twitter.com/piG5RxwuwQ
— तैमूर का जीजा 😎 🇮🇳 (@brijeshchaodhry) December 30, 2025
हा व्हिडिओ @brijeshchaodhry नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “रीलसाठी भाऊ थेट कबाबच झाला असता.” तर दुसऱ्याने, “जळतं भूत बाईक चालवत असल्यासारखं वाटतंय,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी अशा धोकादायक स्टंट्सवर नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे स्टंट अत्यंत जीवघेणे असून गंभीर भाजणे किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे रील्स आणि व्हायरल होण्याच्या नादात जीवाशी खेळ करणे टाळावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा संदेश या घटनेतून मिळतो.Trending News Viral Video








