Solar Panel Yojana: वाढत्या वीजबिलांवर दिलासा! ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना’ ठरत आहे सर्वसामान्यांसाठी वरदान
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलांच्या वाढत्या रकमेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. महिना संपला की वीजबिल हातात येताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र अशा परिस्थितीत केंद्र सरकारची नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवल्यास दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळते. त्यासोबतच सरकारकडून मोठ्या प्रमाणात सबसिडी थेट बँक खात्यात जमा केली जाते. देशभरात 1 कोटी घरांवर सोलर प्लांट बसवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले असून त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये या योजनेबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना’ नेमकी आहे तरी काय? Solar Panel Yojana
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांनी स्वतःची वीज स्वतः तयार करावी. घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवल्यानंतर सूर्यप्रकाशाच्या मदतीने वीज निर्मिती होते. यामुळे महिन्याला हजारो रुपयांची वीजबिलात बचत होते.
ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेचा त्रासही या सोलर प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात कमी होतो. याशिवाय प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
ज्या नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याइतकी जागा उपलब्ध आहे, असे सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पूर्णपणे ऑनलाइन आहे.Solar Panel Yojana
- मोबाईल नंबरद्वारे पोर्टलवर लॉगिन
- अर्ज भरून आवश्यक माहिती सबमिट
- DISCOM कडून मंजुरी
- अधिकृत वेंडरकडून घराची पाहणी
- योग्य kW चा सोलर प्लांट बसवला जातो
- नेट मीटर बसवल्यानंतर मोफत वीज सुरू
सरकारकडून किती सबसिडी मिळते? Solar Panel Yojana
या योजनेतील सबसिडीचे प्रमाण नागरिकांसाठी अत्यंत आकर्षक आहे 👇
- 1 kW साठी – ₹30,000
- 2 kW साठी – ₹60,000
- 3 kW किंवा त्यापेक्षा अधिक – ₹78,000
विशेष म्हणजे, काही राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या सबसिडी व्यतिरिक्त राज्य सरकारकडूनही अतिरिक्त मदत दिली जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांना सोलर सिस्टम जवळजवळ अर्ध्या किमतीत बसवता येते.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वीजबिल
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
याशिवाय उर्वरित सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण होते.
वीजबिलाची कायमची चिंता संपणार
एकदा सोलर सिस्टम कार्यान्वित झाल्यानंतर दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळते. अनेक घरांचे वीजबिल शून्यावर येत आहे, तर काहींचे बिल अत्यल्प झाले आहे.
शहर असो वा ग्रामीण भाग, वीजबिलाची चिंता प्रत्येक कुटुंबाला असते. त्यामुळे ही योजना अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
सरकारचा उद्देश काय?
- जास्तीत जास्त घरे सौर ऊर्जेचा वापर करतील
- नागरिक स्वतःची वीज स्वतः तयार करतील
- देशाचे कार्बन उत्सर्जन कमी होईल
- सामान्य नागरिकांच्या घरगुती खर्चात मोठी बचत होईल
आधी महाग वाटणारी सोलर प्रणाली आता सबसिडीमुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. त्यामुळे हजारो कुटुंबे आधीच वीजबिलाच्या ताणातून मुक्त झाली असून, अजूनही मोठ्या प्रमाणात अर्ज सुरू आहेत.












