Heavy Rainfall Help: नमस्कार मित्रांनो, राज्यभरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केलेली आहे. (Heavy Rainfall Help) या घोषणेनुसार प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबांना आता मदत मिळणार आहे. कशाप्रकारे ही मदत मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
पूरग्रस्तांसाठी एका मोठ्या मदत पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे. पूरग्रस्त कुटुंबांना रोख रक्कम आणि अन्नधान्य त्वरित उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना देखील मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. (Heavy Rainfall Help) पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीचे निर्देश दिलेले आहेत.
पूरग्रस्त कुटुंबांसाठी मदत..! (Heavy Rainfall Help)
- रोख रक्कम प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 5000/- रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे.
- तसेच पूरग्रस्त कुटुंबांना 35 किलो धान्य देखील वितरित केले जाणार आहे.Heavy Rainfall Help
पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्या कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबांना 4 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच ही रक्कम लवकरच पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सुपीक जमिनी वाहून देखील गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी पिकाच्या नुकसान भरपाई करिता 13 हजार 600 रुपये प्रति एकर इतकी अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आलेली आहे.Heavy Rainfall Help
तसेच झोपडी दुरुस्तीसाठी ज्यांच्या झोपड्यांची पडझड झाली आहे. अशा कुटुंबांना पुनर्बांधणीसाठी 10 हजार रुपयांपर्यंतची मदत देखील मिळणार आहे. तसेच संपूर्ण घर कोसळल्यास त्याची देखील सरकारी नियमानुसार अतिरिक्त भरपाई दिली जाणार आहे. व राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पूरग्रस्तांसाठी आवश्यक असलेले बजेट तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे मदतीच्या वितरणाला विलंब न होता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मुख्यमंत्री तसेच उपमख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे, की पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असणार आहे, व प्रत्येक नागरिकांना मदत मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. Heavy Rainfall Help