Mofat Bhandi Yojana : बांधकाम कामगार योजने अंतर्गत मिळणार मोफत भांडी

Published On: September 29, 2025
Follow Us

Mofat Bhandi Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन गरीब नागरिकांसाठी नवीन नवीन योजना राबवत असते. जेणेकरून त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये योजनांचा लाभ होईल. बांधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना आली आहे. Mofat Bhandi Yojana भांडी संच वाटप योजना या योजनेअंतर्गत भांडे मिळणार आहेत. या योजनेबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कोणत्या नागरिकांना ही भांडी मिळणार आहेत, व याचा लाभ आपण कशाप्रकारे घेऊ शकतो, यासाठी पात्रता अटी याबद्दल माहिती पाहूया. Mofat Bhandi Yojana

या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे बांधकाम मजुरांच्या कुटुंबांना स्वयंपाक व घरगुती वापरासाठी लागणारा संपूर्ण भांडीसंच मोफत उपलब्ध करून देणे हा आहे. तुम्ही जर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि मिळणाऱ्या ३० भांड्यांची यादी याबाबतची सर्व माहिती खाली दिली आहे.Mofat Bhandi Yojana

बांधकाम कामगार मोफत भांडीसंच योजना ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्याद्वारे राबवली जाते. ही योजना प्रथम १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाली होती आणि काही काळ थांबल्यानंतर आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या ३० वस्तूंचा भांडीसंच पूर्णपणे मोफत दिला जातो. कामगारांच्या दैनंदिन गरजांसाठी थोडा आर्थिक दिलासा मिळावा, हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा संपूर्ण लाभ पात्र कामगारांना कोणत्याही प्रकारचा खर्च न करता उपलब्ध होतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई येथे अधिकृत नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर कामगारांना मंडळाकडून स्मार्ट कार्ड दिले जाते आणि ते कार्ड सक्रिय असणे गरजेचे आहे. Mofat Bhandi Yojana जे कामगार मंडळाच्या इतर कल्याणकारी योजनांसाठी पात्र आहेत, तेच या भांडीसंच योजनेसाठी देखील अर्ज करू शकतात.Mofat Bhandi Yojana

या मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये आधार कार्ड, बांधकाम कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र (कामगार कार्ड), रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, किमान ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र, हमीपत्र तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे.Mofat Bhandi Yojana

Registration

  • 1. महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाइटला https://mahabocw.in/ भेट द्या.
  • 2. “Workers Registration / कामगार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.
  • 3. नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर व इतर वैयक्तिक माहिती भरा.
  • 4. आधार कार्ड, रहिवासी दाखला, ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे अपलोड करा.
  • 5. फॉर्म नीट तपासून घ्या.
  • 6. शेवटी “Submit” वर क्लिक करून अर्ज पूर्ण करा. ✅

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!